एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनविला शाडू मातीपासून गणपती....
पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेत शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली.
गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन मा.मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनूर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री भाऊसाहेब येळे यांच्या प्रास्ताविकाने कार्यशाळेत सुरुवात झाली, पर्यवेक्षिका सरोज मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
सासवड परिसरातील नामांकित योगाचार्य श्री.घनश्याम खांडेकर यांनी प्रशालेच्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना गणपतीची मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन प्रत्यक्षिकाद्वारे केले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः गणेश मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला. त्याच बरोबर याच मूर्तीची आपल्या घरी स्थापना करण्याचा देखील निश्चय केला, जेणेकरून जलप्रदूषण कमी करण्यास मदत होईल हा त्या मागचा उद्देश होता. मुलांसोबत सर्व शिक्षकांनी देखील गणेश मूर्ती तयार केली. कार्यक्रमाच्या प्रमुख प्रतीक्षा बोळगे यांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन केले व स्वाती पांढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी एम.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल सासवड प्रशालेमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिना निमित सन २०१२ पासून २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो . या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर व तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सरोज मॅडम, क्रीडा शिक्षक श्री. नितीन ठोंबरे, व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . येळे भाऊसाहेब यांनी केले व यांनी मेजर ध्यानचंद यांचा क्रीडा विश्वातील संपूर्ण प्रवास उपस्थितींना सांगीतला. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगीतले तसेच तालुका स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी सर्व खेळाडूंचे, घोष पथकाचे नेतृत्व करणारी साजिरी माने यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या नंतर अक्षरा क्षीरसागर या विद्यार्थिनी सोबत सर्वांनी फिट इंडियाची शपथ घेतली. शेवटी खेळदल या तासिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा भारतीच्या 'खेल खिलाडी खेल' या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्वच्छ व पर्यावरणपूरक शाळा तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत आज एम.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड प्रशालेमध्ये मॉक ड्रिल ( Mock Drill ) घेण्यात आले. अचानक आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे किंवा कोणत्या कृती कराव्यात हे विद्यार्थ्यांना समजावे हा या मागील उद्देश होता.







































