महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा 165 वा वर्धापन दिन एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला……
याप्रसंगी म.ए.सो. बारामती प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक श्री. मधुकर हेंद्रे सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते .
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापकांच्या व सरस्वतीमातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सौ.रुचिरा गार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली म.ए.सो. गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.भाऊसाहेब येळे यांनी संस्थेचा इतिहास व वाटचाल याबाबत माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. हेंद्रे सर यांनी संस्थापकांविषयी माहितीपर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर – नागनूर यांनी विद्यार्थ्यांना संस्थेचे “क्रियाविण वाचाळता व्यर्थ आहे” हे ब्रीदवाक्य आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय श्री. भाऊसाहेब येळे व सौ.स्वाती पांढरे यांनी केले.
कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सरोज जांगडा, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गीता प्रभुणे यांनी केले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.








