PALKHI SOHALA

एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवडचा पालखी सोहळा
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेतील विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आज संत सोपानकाका मंदिरामध्ये उत्साहात साजरा झाला. प्रमुख पाहुणे ह.भ.प. स्वप्निल महाराज काळाने व प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका कल्पना नागनूर यांच्या हस्ते पालखी व संतरूपी बालचमुंचे पूजन करण्यात आले. यावेळी छोट्या गटापासून ते आठवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी तालासुरात अभंग,भजन गायन केले. तसेच काहींनी विठ्ठल प्रेमाचा भाव व्यक्त करणारे नृत्य व मनोरे सादर केले. त्यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.
मा.मुख्याध्यापिका कल्पना नागनूर मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकात पालखी सोहळ्याचे महत्त्व पटवून दिले. तर प्रमुख पाहुणे ह.भ.प.स्वप्निल महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या उदाहरणातून जीवनमूल्य सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली रुचिरा गार्डी व निकिता होले तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. भाऊसाहेब येळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.